उन्हाळेतील गरम पाण्याचा झरा परिसराचे सुशोभीकरण

Payal Bhegade
30 Nov 2023
Blog

राजापूर : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत शहरानजीकच्या उन्हाळे येथील प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा परिसर विकासासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून या परिसरामध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार असून, उन्हाळे गरम पाण्याचा झरा तीर्थक्षेत्राला पर्यटनदृष्ट्या विकासाला चालना मिळणार आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघातील पर्यटनस्थळांचा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी सोयीसुविधांची उभारणी व्हावी यासाठी निधी उपलब्ध म्हणून आमदार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश येताना आमदार यांच्या मागणीनुसार राज्याच्या पर्यटन विभागाचे सचिव , उपअभियंता यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी तालुका दौरा केला होता. या दौऱ्‍यावेळी शहरानजीकच्या उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगातीर्थक्षेत्रासह गरम पाण्याचा झरा या ठिकाणी भेट दिली होती. या वेळी स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्‍यांशी चर्चा सविस्तर चर्चा केली होती. त्यामध्ये उन्हाळे गरम पाण्याच्या झऱ्या‍च्या ठिकाणी संरक्षण भिंत आणि चेजिंग रूम उभारणीसाठी निधी मिळावा, अशी ग्रामस्थांच्यावतीने मागणी करण्यात आली. त्यावर चर्चा होताना आमदार यांनीही अधिकाऱ्‍यांशी चर्चा करताना पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तत्काळ निधी मिळावा, अशी मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा निधी उपलब्ध व्हावा, असेही त्यांनी सूचित केले होते.